शिंदेवाडी येथे आलेल्या पुराच्या पाण्यातून  जात विद्युत पुरवठा केला सुरळीत

वीज कर्मचाऱ्यांची कौतूकास्पद कामगिरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिंदेवाडी ता. कागल येथे वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून महापुराच्या दोन ते तीन फूट पाण्यातुन पायी जाऊन शिंदेवाडी विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांनी बंद असलेला विद्युत पुरवठा सुरु करून आपले कर्तव्य व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे शिंदेवाडी ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Advertisements

गेल्या १० दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला महापूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे वेदगंगा नदी शेजारील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यामुळे शुक्रवारी   गावातील कांही भागात विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे अंधार पसरला होता.

Advertisements

याची विज जोडणी प्रधान-तंत्रज्ञ युवराज मांगोरे व सचिन वांद्रे यांनी तत्काळ दखल घेतली. व आपले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून अन्य युवक वैष्णव ढेरे, संग्राम शिंदे व आदित्य ढेरे यांच्या साह्याने पुराच्या पाण्यातून जाऊन विद्युत पुरवठा सुरू केला. या त्यांच्या धाडसी कार्याबद्दल शिंदेवाडी ग्रामस्थांच्यातून कौतुक होत आहे.

Advertisements
AD1

2 thoughts on “शिंदेवाडी येथे आलेल्या पुराच्या पाण्यातून  जात विद्युत पुरवठा केला सुरळीत”

  1. I simply could not go away your web site prior to suggesting that I really enjoyed the standard info a person supply on your guests Is going to be back incessantly to investigate crosscheck new posts

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!