ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रेरणादायी कार्य

सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली ता. कागल येथील गावसाठी पाणी पुरवठा करणारी मोटारीचे काम करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकारी येऊ पर्यंत काय करावे म्हणत लगतच असणाऱ्या स्मशानभूमीची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता स्मशान भूमी स्वच्छ केली.

अधिक माहिती अशी, गेले 3 तर चार दिवस सिद्धनेर्ली  परिसरात संतधार पावसाने दूधगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. वाढलेल्या पाण्याच्या पातळीने गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल मधील मोटारीचे काम करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांना जॅकवेल जवळ पाठविण्यात आले होते. त्याच्या सोबत इतर ही महावितरणचे कर्मचारी काम करण्यासाठी येणार होते.

Advertisements

मात्र वेळच्या आधीच ग्रामपंचायत कर्मचारी दगडू कांबळे, दगडू तांदळे आणि पाणी पुरवठा विभागाचे विजय पाटील पोहचले. अजून कोणीही आलेले नाही लक्षात आल्यावर तो  पर्यंत आपण काय करायचं हा प्रश्न पडला असतानाच शेजारीच असणाऱ्या स्मशान भूमीची  स्वच्छता करायला चालू केली आणि बघता बघता ह्या तिघांनी संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

दगडू कांबळे, दगडू तांदळे आणि विजय पाटील यांनी केलेल्या कामाची गावतील नागरिकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

One thought on “ग्रामपंचायत कर्मचारी कडून स्मशानभूमीची स्वच्छता”
  1. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!