कागल (विक्रांत कोरे) : रखरखत्या उन्हामुळे माळरानातील पिके करपून गेली होती. अवकाळी पडलेल्या पावसाने या पिकांना पुन्हा पालवी फुटली आहे. करपलेली पाने हिरवीगार होऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकरी आनंदीत झाला आहे.
मे महिना म्हणजे रखरखते ऊनं विहीर ,ओढे,व नाले यांचे पाणी आटलेले.या रखरखत्या उन्हामुळे पिकांना पुरेशी पाणी मिळत नाही ,किंबहुना मिळालेच नाही. त्यामुळे शेतकरी राजा त्रस्त झाला होता .पाण्याअभावी पिके तडफडू लागली होती. पाने करपून गेले होती. पिकांची वाढ खुंटली होती. करपलेल्या शेतीकडे बघण्याचे त्राण शेतकऱ्यांत उरले नव्हते. शेतकरी वाळलेल्या पिकांच्या विवंचनेत होता. तो काळजीने खचला होता.
मात्र निसर्गाची अद्भुत लिला प्रत्ययस आली. गेल्या आठवड्याभरात वादळी अन् विजेचा कडकडाट होऊन तुफान पावसाचा मारा झाला . नद्या- नाल्यांना पाणी आले.आणि पिकांना आठवडाभरात पालवी फुटली. पानापानात हिरवा पणा येऊ लागला. पिकांना उभारी आली.पिके जोमाने डौलू लागली.
अवकाळी पडलेल्या धुवाधार पावसाने पिकांना पालवी फुटली, तशी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला.