मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांच्या वनश्री मोफत रोपवारीकेच्या माध्यमातून २००४ पासून संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्य विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाचे हे २० वे वर्ष असून प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी ही गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्य संत गाडगेबाबा प्रतिमापूजन व झुणका भाकर प्रसाद वाटप आणि श्रमिक कष्टकरी उपेक्षितांचे सत्कार, निराधार निराश्रीतानां ब्लँकेट वाटप व निष्काम कर्मयोगी गाडगेबाबा आचार, विचार आणि आजची वर्तमान स्थिती या विषयावर मा. कॉ. संपत देसाई ( आजरा ) यांचे व्याख्यानाचे आयोजन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विजयमाला मंडलिक गर्ल स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा पाटील या भुषविणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. आनंद चव्हाण गारगोटी व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मा. ग . गुरव हे लाभले आहेत.
मुरगूडचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, कापड उद्योजक दामोदर वागवेकर, हाजी बाळासाहेब मकानदार, माजी नगरसेवक सुहास खराडे, सामाजिक कार्यकर्ते सुनील कोले, कार्यवाह आण्णासो थोरवत, व्यापारी पतसंस्था चेअरमन किरण गवाणकर, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे तुकाराम भारमल, लाडू सप्लायर्स राजाराम चव्हाण, युवा उद्योजक मयूर आंगज, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सविता पोवार व लिटल मास्टर गुरुकुलमच्या मुख्याध्यापिका सुमन अनावकर यांची प्रमुख उपस्थितीत लाभणार आहे.
हा संयुक्त कार्यक्रम रविवार दि. २४ / १२ / २०२३ रोजी ११ वाजता वनश्री रोपवाटीका ( वाडेकर वसाहत ) येथे संपन्न होणार असून सर्वांनी या कार्यक्रमाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन “झाडमाया ” मित्रपरिवारातर्फे करण्यात आले आहे.