मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील विविध ठिकाणी ध्वजारोहण समारंभ अत्यंत दिमाखदारपणे पार पडला. हुतात्मा तुकाराम चौकातील मुख्य ध्वजारोहण मुरगूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आतिश वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले.
या समारंभाला शहरातील मान्यवर, विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय सेवक वृंद त्याच प्रमाणे अबालवृद्ध उपस्थित होते.

हुतात्मा स्मारकातील ध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिकाचे वारसदार राणोजी गोधडे, नगरपालिका कार्यालयासमोरील ध्वजारोहण सॅनिटरी मुकादम फ्रान्सिस बारदेस्कर, श्री. व्यापारी नागरी सह .पतसंस्थेचे ध्वजारोहण संचालक शशिकांत दरेकर, लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे ध्वजारोहण संचालिका भारती कामत, कै. सुलोचनादेवी पाटील बालवाडीचे ध्वजारोहण पॅरा कमांडो हवालदार राजेंद्र खंडागळे, राणा प्रताप क्रीडा मंडळाचे ध्वजारोहण जनार्दन सापळे, शिवराज हायस्कूलचे ध्वजारोहण प्रभारी प्राचार्य व्ही. बी. खंदारे यांच्या हस्ते करण्यात आले.

हुतात्मा तुकाराम वाचनालयाचे ध्वजारोण गणेश नागरी सहकारी पत संस्थेचे माजी चेअरमन उदयकुमार शहा यांच्या हस्ते करण्यात आले . तसेच सदाशिव मंडलीक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . शिवाजी होडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. गणेश नागरी सह. पतसंस्था , व अन्य ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.