
कागल : सरसेनापती संताजी घोरपड़े साखर कारखान्याचा गळीत हंगाम 23 नोव्हेंबरला सुरु झाला. आजअखेर कारखान्याने दोन लाख 80 हॅजार 60 टन उसाचे गाळप केले. 12.16 च्या उताऱ्याने 02 लाख 31 हजार 870 क्विंटल साखर उत्पादित झाली.
कारखान्याने यापूर्वी प्रतिटन 3100 रुपयांप्रमाणे ऊस बिले दिली आहेत. त्याचबरोबर तोडणी-वाहतूक कंत्राटदारांची बिलेही निर्धारित वेळेत दिली आहेत.
कारखान्याने आता 16 जानेवारीनंतर गाळपास येणाऱ्या उसाची बिले 3150 रुपयांप्रमाणे देण्याचे निश्चित केले आहे. शेतकऱ्यांनी सर्व ऊस गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे.