9 लाख 78 हजार 600 रुपयांचा निव्वळ मद्यसाठा
कोल्हापूर, दि. 10 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 कडून वाहनासह 14 लाख 28 हजार 600 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत 9 लाख 78 हजार 600 रुपये असल्याची माहिती कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक एस.एम. मस्करे यांनी दिली आहे.
कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर- नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 ला राधानगरी – कोल्हापूर रोडवरुन एका चारचाकी सिल्व्हर कलरच्या जेनिओ वाहनातून अवैध गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. या पथकाने कोल्हापूर-राधानगरी रोड, क्रशर चोक, इरानी खान रंकाळा तलाव जवळ, कोल्हापूर शहर येथे सापळा लावून पाळत ठेवली असता दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास एक संशयित इसम चारचाकी महिंद्रा कंपनीची जेनिओ रजि.क्र. MH-07-P-4755 येत असलेली दिसली. या वाहनास थांबवून वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील हौदामध्ये गोवा राज्य निर्मित, गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेले व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्य व बिअर ने भरलेले कागदी पुठ्याचे विविध बँडचे 180, 500 तसेच 750 मिलीचे एकुण 151 बॉक्स आढळून आले.
या प्रकरणी प्रसाद महादेव नराम व.व.51, रा. घर नं-११८४, मु.पो. फोंडाघाट, हवेली नगर, ता. कणकवली, जि. सिंधुदर्ग-४१६६०१ या आरोपीस अटक केली असून पकडण्यात आलेल्या जेनिओ मध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्य व बिअर चा मद्यसाठा आढळून आला आहे. वाहनासह मद्याची एकूण किंमत 14 लाख 28 हजार 600 रुपयांची असून निव्वळ मद्याची किंमत 9 लाख 78 हजार 600 रुपये इतकी आहे. या गुन्ह्यामध्ये सापडलेल्या आरोपी व्यतिरीक्त त्याच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का? तसेच या मद्याचा कोठे पुरवठा करणार होता? याबाबतचा तपास सुरु आहे. या गुन्ह्यातील आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे, दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, सहायक दुय्यम निरीक्षक कांचन सरगर व जवान विलास पवार, विशाल भोई, सचिन लोंढे, धीरज पांढरे, प्रसाद माळी, साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे हे करत आहेत.
- मुश्रीफ हसन मियालाल ( नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), घड्याळ 51%, 42769 votes42769 votes 51%42769 votes - 51% of all votes
- घाटगे समरजितसिंह विक्रमसिंह (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार) तुतारी वाजवणारा माणूस 48%, 39914 votes39914 votes 48%39914 votes - 48% of all votes
- रोहन अनिल निर्मळ, (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), रेल्वे इंजिन 0%, 373 votes373 votes373 votes - 0% of all votes
- सातापराव शिवाजीराव सोनाळकर (अपक्ष) ट्रम्पेट 0%, 154 votes154 votes154 votes - 0% of all votes
- धनाजी रामचंद्र सेनापतीकर (वंचित बहुजन आघाडी), गॅस सिलेंडर 0%, 62 votes62 votes62 votes - 0% of all votes
- पंढरी दत्तात्रय पाटील (अपक्ष) रोड रोलर 0%, 61 vote61 vote61 vote - 0% of all votes
- अशोक बापू शिवशरण (बहुजन समाज पार्टी) हत्ती 0%, 13 votes13 votes13 votes - 0% of all votes
- ॲड. कृष्णाबाई दिपक चौगुले (अपक्ष), ब्रीफ केस 0%, 12 votes12 votes12 votes - 0% of all votes
- प्रकाश तुकाराम बेलवाडे (अपक्ष) शिट्टी 0%, 12 votes12 votes12 votes - 0% of all votes
- विनायक अशोक चिखले (अपक्ष), ऑटोरिक्शा 0%, 4 votes4 votes4 votes - 0% of all votes
- राजु बाबू कांबळे (अपक्ष), हिरा 0%, 2 votes2 votes2 votes - 0% of all votes