११ वी प्रवेश प्रक्रिया: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

मुंबई : इयत्ता ११ वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत २६ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन नोंदणी पोर्टल सुरू झाले आहे. या पोर्टलद्वारे पहिल्याच दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना ही प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करता यावी यासाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Advertisements

प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे

  • महाविद्यालय निवड: विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार जास्तीत जास्त १० उच्च माध्यमिक विद्यालये निवडण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध आहे.
  • प्रवेश अर्ज: ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावा लागणार असून, अर्जात नमूद केलेल्या प्राधान्यक्रमानुसार, आराखडा आणि गुणवत्ता गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल.
  • जागा उपलब्धता: ‘CAP’ अंतर्गत एकूण १८,७४,९३५ जागा उपलब्ध आहेत, तर नोंदणीकृत महाविद्यालयांची संख्या ९,३३८ आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • प्रवेश रद्द करणे: व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा व अल्पसंख्याक कोट्यातून मिळालेल्या प्रवेशाच्या रद्द करण्यासंदर्भातील कार्यपद्धती विद्यार्थ्यांनी नीट समजून घ्यावी.
  • संमती अनिवार्य: प्रत्येक प्रवेश फेरीत विद्यार्थ्यांनी आपली संमती (consent) अनिवार्यपणे नोंदवणे आवश्यक आहे.
  • पुढील फेऱ्यांमध्ये सहभाग: ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळणार नाही, त्यांना पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.
  • तात्पुरती यादी: ५ जून २०२५ रोजी तात्पुरती सर्वसाधारण प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे.

मार्गदर्शन व सहाय्यता

विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना मदत मिळावी आणि महाविद्यालयांकडून कागदपत्रांची तपासणी योग्यरित्या व्हावी, यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांमार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती माहिती पुस्तिकेत आणि ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहे.

Advertisements

प्रवेश प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावर मार्गदर्शन व मदत केंद्रे (Guidance and Help Centers) स्थापन करण्यात आली आहेत.

Advertisements

तांत्रिक अडचण किंवा इतर मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी सहाय्यता क्रमांक: ८५३०९५५५६४ वर किंवा ई-मेल: support@mahafyjcadmissions.in वर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. पालकर यांनी केले आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!