50 व्या ग्रंथ भेट योजनेसाठी निवड झालेल्या ग्रंथांची यादी 15 ऑक्टोबर पर्यंत खुली

कोल्हापूर : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून 50 व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत सन 2023 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी निवड केलेल्या 1 हजार 388 ग्रंथांची यादी (मराठी 749, हिंदी 297, इंग्रजी 342) ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in  या  संकेतस्थळावर दिनांक 26 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आली आहे. या ग्रंथ यादीतील ग्रंथ किमान 25 टक्के सूट दराने वितरीत करणे बंधनकारक आहे.

Advertisements

         या ग्रंथ यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबतची सूचना/ हरकती/ आक्षेप असल्यास  दिनांक 15 ऑक्टोबर 2025 पर्यत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई-400 001 यांच्याकडे लेखी स्वरुपात कार्यालयीन वेळेत हस्त बटवडयाने वा पोस्टाने अथवा उपरोक्त नमूद केलेल्या ई-मेलवर मुदतीत पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त सूचनांचा/ हरकतींचा/ आक्षेपांचा/ विचार केला जाणार नाही.

Advertisements

               यादीत ग्रंथाचे नांव, लेखक, प्रकाशक व किंमत यामध्ये काही बदल असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास स्वागतार्ह असेल, असे आवाहन अशोक गाडेकर, प्र. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगरभवन, मुंबई यांनी केले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!