इ.स. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुस-या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत दि. ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस "जागतिक महिला दिन” म्हणून परिषदेने स्वीकारावा असा ठराव मांडला गेला व तो पास झाला.

महिला दिन हा आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्यांचा गौरव करण्याचा दिवस आहे. ब-याच ठिकाणी महिला दिन साजराही केला जातो पण अजुनही कर्तबगारीची धमक असुन सुध्दा आज स्त्री ही उपेक्षीत आहे. याला कारण म्हणजे या महिलांना हा समाज संधीच देत नाही.

त्यामुळे तिची तिच्या आत सुप्त राहीलेली कर्तबगारी ही तशीच अप्रकट राहते. मात्र एखाद्या दिवशी आपण तिच्या क्षमतेवर विचार केला व तिला तिच्यातील क्षमता सिध्द करुन दाखवण्याची संधी दिली तर महिला काय करु शकते हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल

देश, समाज, वस्ती अथवा व्यक्ती कोणतेही असो पण वास्तव मात्र हे आहे की, परंपरेने धर्माने रुढीने आणि समाजाच्या पुरुष प्रधान वागणुकीमुळे आजही अर्धी मानवता अशी उपेक्षीत राहीलेली आहे.

आपण आपल्या आसपास पाहील्यावर असे निर्दशनास येते की, महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळाली आहे. त्या-त्या सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी स्वत:ची प्रगती करुन आपले वेगळेपण या समाजाला सिध्द करुन दाखविले आहे.

मुलगी ही अधिक परिपक्व असते. लहान पणापासूनच आपल्या जीवनाकडे गंभीरपणे बघण्याचे, जबाबदारीने वागण्याचे शिक्षण दिले जाते. मुलगी ही उद्याची माता आहे. 

अंतरराष्ट्रीय  महिला दिनाच्य हार्दिक शुभेच्छा